कुत्र्यांमध्ये आत्मा पाहण्याची विशेष शक्ती असते असं मानलं जातं. कारण कुत्र्यांची इंद्रिय मानवाच्या तुलनेत संवेदनशील असतात. त्यामुळे त्यांना लगेच भास होतो असं मानलं जातं.
अनेकदा कुत्रे विचित्र वागतात. एखाद्या जागेवर कोणीच नसताना भुंकणं किंवा गुरगुरताना दिसतात. या ठिकाणी काहीतरी असल्याचं जाणीव होते, असं मानलं जातं.
कुत्र्यांची वास घेण्याची आणि ऐकण्याची क्षमता माणसापेक्षा तीव्र असते. त्याने लगेच वास आणि ऐकू येतं. त्यामुळे कुत्रे लगेच प्रतिक्रिया देतात. अनेकदा रात्रीचे रडतातही.
काहीच कारण नसताना कुत्रे भुंकतात, गुरगुरतात. अनेकदा घाबरतात. तसेच रडू लागतात. त्यामुळे लोकं असं मानतात की त्यांना काहीतरी अदृश्य शक्ती दिसली आहे.
काहीवेळा कुत्रे एका विशिष्ट ठिकाणी जाणं टाळतात. त्यामुळे लोकांना वाटतं की तिथे काहीतरी असावं. त्यानुसार अंदाज बांधतात.
पॅरानॉर्मल एक्सपर्टच्या मते, कुत्र्यांना आत्मा दिसते. कारण त्यांची पाहण्याची क्षमता मानवापेक्षा अधिक तीव्र असते.
वैज्ञानिक दृष्टीकोनातून भूत-प्रेत वगैरे या गोष्टी थोतांड आहेत. त्यामुळे कुत्र्यांना असं काही दिसतं हे खोटं आहे.