24 october 2025
Created By: Atul Kamble
वास्तू शास्रानुसार घरातील रचना असावी, वास्तू दोष दूर करणे गरजेचे असते.
घरातील देव्हाऱ्यात काही वस्तू ठेवू नये असे वास्तूशास्र सांगते
घरातील देव्हाऱ्यात आपल्या नातेवाईकांचे फोटो ठेवू नये. तसेच साधू संतांचेही फोटो ठेवू नये. त्याने नकारात्मत ऊर्जा वाढते. आणि सुख शांती नष्ट होते.
देव्हाऱ्यात काली माता,राहु-केतू आणि शनिदेवाचे फोटो आणि मूर्ती ठेवू नये. या देवता कडक मानल्या जातात.मंदिरात शांत-सौम्य देवतांचे फोटो किंवा मूर्ती ठेवावी
देव्हाऱ्यात नाचणाऱ्या गणेशाची मूर्ती ठेवू नये.गणेशाची बसलेली आणि आशीर्वाद देतानाची मूर्ती ठेवावी.याने सुख वाढते.
घरातील मंदिरात माता लक्ष्मीची मूर्ती अवश्य ठेवावी. लक्ष्मी माता धन आणि समृद्धीची देवता असते. त्यामुळे दरिद्री नष्ट होते.
घरातील मंदिरात माता लक्ष्मीची उभी मूर्ती ठेवू नये बसलेली मूर्ती ठेवावी,भगवान विष्णूची मूर्ती मंदिरात ठेवावी.