3 मार्च 2025
पर्समध्ये या वस्तू चुकूनही ठेवू नका, आर्थिक कोंडीचं बनेल कारण!
वास्तुशास्त्रात व्यक्तीचं जीवन समृद्ध व्हावं यासाठी अनेक उपाय सांगितले गेले आहे. यामुळे देवी लक्ष्मीची कृपा राहते.
प्रत्येक व्यक्ती स्वत:जवळ पर्स ठेवते. वास्तुशास्त्रात यासाठी काही नियम सांगितले आहेत. पर्समध्ये काय ठेवावं आणि काय नाही?
पर्समध्ये काही गोष्टी ठेवण्यास वर्जित केलं आहे. यामुळे आर्थिक कोंडीचा सामना करावा लागू शकतो. चला जाणून घेऊयात.
वास्तुशास्त्रानुसार, पर्समध्ये चाकू, पिन आणि धातुने बनवलेल्या वस्तू ठेवू नयेत. यामुळे देवी लक्ष्मी नाराज होते.
पर्समध्ये जुनी बिलं आणि रिसिट ठेवू नयेत. यामुळे व्यक्तीला राहुदोष लागतो. धनहानीही होऊ शकते.
काही लोकं तंबाखू, गुटखा वगैरे पर्समध्ये ठेवतात. यामुळे आर्थिक संकट ओढावते.
पर्समध्ये पूर्वज किंवा देवाचा फोटो ठेवू नये. ठेवल्यास विटंबना होणार नाही याची काळजी घ्या. पर्स फाटलं असेल तर लगेच बदलून घ्या.