5 मार्च 2025
किचनजवळ देव्हारा ठेवू नये! काय सांगतं वास्तुशास्त्र? जाणून घ्या
वास्तुशास्त्रानुसार, घराची बांधणी केली तर सकारात्मक उर्जेचा प्रभाव राहतो. किचन आणि देव्हाऱ्याबाबतही नियम आहेत.
किचन हे अग्नितत्वाशी निगडीत आहे. देव्हाऱ्यात सकारात्मक आणि शांत ऊर्जा असते. किचनमधून राजसिक आणि तामसिक ऊर्जा उत्पन्न होते.
किचनमध्ये अग्नि आणि जल तत्वाचा प्रभाव दिसतो. गॅस आणि सिंक, नल असतो. यामुळे उर्जेत बाधा येते.देव्हाऱ्यातील सकारात्मक ऊर्जा यामुळे प्रभावित होते.
देव्हाऱ्यासाठी ईशान्य कोपरा योग्य मानला जातो. किचन जवळपास असल्यास याचा प्रभाव पडतो. या घरात सकारात्मक उर्जेचा प्रभाव कमी असतो.
किचनजवळ देव्हारा असल्यास नकारात्मक उर्जेचा प्रभाव वाढतो. त्याचा परिणाम घरातील व्यक्तींच्या आरोग्यावर पडतो.
ज्योतिषशास्त्रानुसार, अशा स्थितीत घरात राहु आणि केतुचा प्रभाव वाढतो. यामुळे आजार आणि अपघाताची शक्यता असते.
देव्हारा हे घरातील पवित्र स्थान आहे. ध्यान, पूजा आणि आध्यात्मिक साधना करण्याचं ठिकाण आहे. त्यामुळे योग्य ठिकाणी असलेलं कधीही चांगलं राहील.