21 फेब्रुवारी 2025

चुकूनही या 4 गोष्टी कोणाला सांगू नका, काय सांगते विदुरनिती

धृतराष्ट्राचे महामंत्री विदुर याच्याशिवाय महाभारत पूर्ण होत नाही. विदुर एक बुध्दिवंत आणि महाज्ञानी होता.

विदुरने आपल्या नीतिशास्त्राद्वारे समाजाला न्याय आणि धर्माबाबत अनमोल उपदेश दिला आहे. त्यांचं नीतिशास्त्र आजही लागू होतं. 

विदुरनितीमुळे सामान्य व्यक्तीला जीवनात पुढे जाण्यास मदत होते. विदुरनिती काही गोष्टींबाबत गुपित पाळण्यास सांगितलं आहे. 

विदुरनितीनुसार, व्यक्तीने कधीच धन, संपत्ती आणि कमाईबाबत कोणालाच सांगू नये. तसेच नुकसानीबाबतही सांगू नये. 

विदुरनितीनुसार, व्यक्तीने कमकुवत बाजू कोणालाच सांगू नये. कारण असं केल्यास त्याचा फायदा उचलला जाण्याची शक्यता असते. 

व्यक्तीने आपल्या ध्येय आणि योजनांबाबत कोणालाच सांगू नये. यश मिळाल्यानंतरच याची वाच्यता करावी. 

व्यक्तीने धार्मिक कार्य कोणासही सांगू नये. यामुळे धार्मिक कार्याचं महत्त्व कमी होतं. तसेच कमी लाभ मिळतो.