20  जानेवारी 2025

महाकुंभमेळ्यात पहिल्याच दिवशी किती लोक हरवले?

प्रयागराज महाकुंभ मेळ्यात स्नान करण्यासाठी लाखो भाविक येतात. यावेळी 45 कोटी भाविक येण्याची शक्यता आहे. 

महाकुंभ मेळाव्यात लोकं हरवतात होतात असं आपण ऐकलं आहे. यासाठी प्रशासनाने मदतीसाठी एका बूथची स्थापना केली आहे. 

महाकुंभ मेळ्यात हरवलेल्या व्यक्तींना त्यांच्या प्रियजनांकडे सोपण्यासाठी मदत केंद्र उभारण्यात आलं आहे. 

महाकुंभ मेळाव्याचा पहिला दिवस पौष पौर्णिमेचा होता. या दिवशी लाखो भाविकांनी हजेरी लावली होती. यात 250 लोकं हरवल्याची नोंद झाली आहे. 

उत्तर प्रदेश सिव्हिल डिफेन्स वॉर्डन नितीश कुमार द्विवेदी यांनी सांगितलं की, पहिल्या दिवशी 250 लोकं हरवल्याची नोंद झाली आणि त्यांना पुन्हा कुटुंबियांशी भेट घालून दिली. 

हरवल्याची नोंद येताच अवघ्या दीड तासात संबंधित व्यक्तींचा शोध घेऊन कुटुंबाकडे सुपूर्द केलं, असं त्यांनी सांगितलं. 

महाकुंभ मेळ्यात खोया पाया बूथवर लोकं तक्रार दाखल करतात. तसेच तात्काळ त्यांना मदत केली जात आहे.