11 मार्च 2025
होळीभोवती किती परिक्रमा कराव्यात? जाणून घ्या
हिंदू धर्मात होळी हा प्रमुख सणांपैकी एक आहे. धुळीवंदनाच्या आधीच होलिका दहन करण्याची परंपरा आहे.
होलिका दहन करण्यापूर्वी लोकं होळीची विधीवत पूजा करतात. त्यानंतर रात्री शुभ मुहूर्तावर दहन केलं जातं.
होलिका दहन करताना अग्नित अन्न आणि शुभ वस्तू अर्पण केलं जातात. चला जाणून घेऊयात किती परिक्रमा करायच्या असतात ते...
होलिका दहनात घरावरून श्रीफळ ओवाळून टाकण्याची प्रथाही अनेक ठिकाणी आहे.
होलिका दहनावेळी परंपरेनुसार कमीत कमी तीन वेळा परिक्रमा करणं आवश्यक आहे.
होलिका दहनावेळी तुम्ही 9 किंवा 11 वेळाही परिक्रमा करू शकता. यामुळे शुभ फळ मिळतं.
धार्मिक मान्यतेनुसार, होळी परिक्रमा केल्याने व्यक्तीच्या आयुष्यात सुखसमृद्धी येते. तसेच नकारात्मकता दूर होते.