25 फेब्रुवारी 2025

मासिक पाळीदरम्यान महाशिवरात्रीचं व्रत कसं कराल? 

भोलेनाथाला महाशिवरात्री ही समर्पित आहे. या दिवशी भगवान शंकर आणि पार्वतीची पूजा केल्याने संकटातून दिलासा मिळतो. 

महिलांना अनेकदा व्रतवैकल्य करताना मासिक पाळीचा सामना करावा लागतो. महाशिवरात्रीला अशी स्थिती आल्यास काय करावं?

मासिक पाळीतही व्रत करता येईल. त्यामुळे व्रत मध्येच सोडण्याची गरज नाही. पण मासिक पाळी जर व्रत सुरु करण्यापूर्वीच आली असेल तर करू नका.

मासिक पाळीनंतरही व्रत ठेवायचा असेल तर मनातल्या मनात शिवाची उपासना करा. फक्त पूजा करू नका.

तुम्ही इतर कोणाकडून तरी शिवाची पूजा करू शकता. पूजेच्या साहित्यासाठी पैसे द्या आणि मनातून नामस्मरण करत राहा. 

मासिक पाळी संपल्यानंतर केस धुवून पूजेत भाग घेऊ शकता. देव भक्तिचा भुकेला आहे.