कालसर्प दोष असल्यास कोणत्या मंत्राचा जप करावा?
29 July 2025
Created By: मयुरी सर्जेराव
ज्योतिषशास्त्रानुसार, कुंडलीत कालसर्प दोष असल्याने व्यक्तीला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते.
कालसर्प दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी मंत्रांचा जप करणे खूप फायदेशीर आहे.
हा मंत्र आहे 'ओम क्रौं नमो अस्तु सर्पेभ्यो कालसर्प शांती कुरु-कुरु स्वाहा'.
तसेच 'ओम नमोस्तु सर्पेभ्यो ये के च पृथ्वीमनु ये अंतरिक्षे ये दिवि तेभ्यः सर्पेभ्यो नमः' आणि 'ओम सर्पेभ्यो नमः' या मंत्रांचाही जप करू शकता.
याशिवाय 'ओम नम: शिवाय' आणि 'ओम नागदेवताय नम:' मंत्र देखील फायदेशीर मानले जातात.
नाग गायत्री मंत्र ही म्हणू शकतात, 'ओम नवकुलाय विद्महे विषदन्ताय धीमहि तन्नो सर्प: प्रचोदयात।'
तसेच या मंत्रांचा जप करताना रुद्राक्ष माळेचा वापर करून तो 108 वेळा करावा
( डिस्क्लेमर : ही माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही, अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
दाराच्या मागे कपडे अडकवल्याने घरात काय अडचणी येतात?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा