7 फेब्रुवारी 2025
घरातून निघताना शिंकणं शुभ की अशुभ! जाणून घ्या
शिंक येणं शुभ की अशुभ.. हे सर्वस्वी वेळ, ठिकाण आणि संस्कृतीवर अवलंबून आहे. शकुन शास्त्रात शिंक येणं हे शुभ आणि अशुभ असे दोन्ही बाजू सांगतं.
सकाळी शिंक आली तर शुभ संकेत मानलं जातं. जर दिवसाची सुरुवात शिंक आल्याने झाली तर दिवस चांगला जाईल असं समजा.
एका वेळी दोन शिंका आल्या तर काही मान्यतांनुसार ते देखील शुभ लक्षण मानलं जातं.
एखादी व्यक्ती प्रवासासाठी निघताना शिंक आली तर तेही शुभ मानलं जातं.
एखादी व्यक्ती शुभ कार्यासाठी जात असेल तर शिंक येणं शुभ मानलं जातं.
कोणतंही काम सुरु करताना शिंक आली तर ते अशुभ मानलं जातं.
एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीला भेटण्यासाठी गेला आणि ती व्यक्ती शिंकली तर अशुभ मानलं जातं.