17  जानेवारी 2025

तूळस आणि मनी प्लांटपेक्षा हे रोप सर्वात लकी मानलं जातं, जाणून घ्या

वास्तुशास्त्रात तूळस आणि मनी प्लांटचं महत्त्व आहे. पण यापेक्षाही एक रोप अधिक लकी मानलं जातं. 

क्रसुला अर्थात जेड प्लांट हे शुभ मानलं जातं. या रोपामुळे घरात आर्थिक अडचण येत नाही. 

ज्योतिषशास्त्रानुसार हे रोप चंद्र आणि शुक्राशी संबंधित आहे. हे रोप पूर्व, उत्तर किंवा ईशान्य दिशेला ठेवावं. 

वास्तुशास्त्रानुसार हे रोप नकारात्मक ऊर्जा दूर करते. हे आर्थिक स्थिरतेचे प्रतीक मानलं जातं.

जेड प्लांटमुळे घरात मानसिक शांती आणि समृद्धीला चालना मिळते. 

ज्योतिषशास्त्रानुसार, शुक्र हा धन, वैभव आणि सुखाचा कारक ग्रह आहे. यामुळे शुक्र ग्रह मजबूत होतो. 

वास्तुशास्त्रानुसार, जेड प्लांट धन आकर्षित करतो. त्यामुळे हे रोप मुख्य दाराच्या उजव्या बाजूला किंवा उत्तर पूर्व दिशेला ठेवावं.