17  जानेवारी 2025

देवी लक्ष्मीची कृपेसाठी धर्मशास्त्रात असे उपाय, जाणून घ्या

आपल्या आपल्या दैनदिन जीवनात काही चुकीचा गोष्टी केल्या की त्याचा फटका आपल्याला बसतो. आर्थिक नुकसानही सोसावं लागतं. 

वास्तुशास्त्र मानवी जीवनासाठी खूप महत्त्वाचं मानलं गेलं आहे. नकारात्मक उर्जेमुळे मनुष्याला अनेकदा आर्थिक संकटाला सामोरं जावं लागतं. 

वास्तुशास्त्रात आर्थिक प्रगतीसाठी काही उपायही सांगितले गेले आहेत. या उपयामुळे आर्थिक स्थिती सुधारता येते. 

आर्थिक संकट दूर करण्यासाठी स्वच्छता सर्वात महत्त्वाची आहे. आपले दात स्वच्छ असणं गरजेचं आहे. किडक्या दातांमुळे आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो. 

कायम स्वच्छ कपडे परिधान करावे. स्वच्छ कपडे परिधान करणाऱ्या व्यक्तीकडे पैसा थांबतो. तर खराब कपडे असणाऱ्या व्यक्तीचा खिसा रिकामी राहतो.

घरातील आर्थिक स्थिती चांगली राहावी यासाठी कधीच दिवसा झोपू नये. दिवसा झोपणाऱ्यांच्या घरी पैसा थांबत नाही. 

बेडवर बसून जेवू नये. वास्तुशास्त्रानुसार असं केल्यास आर्थिक फटका बसतो. तसेच पैसा खर्च होत राहतो.