चपाती भाजताना चुकनही करु नका ही चूक, लक्ष्मी देवी होते नाराज!

21 फेब्रुवारी 2025

वास्तुशास्त्रानुसार, किचनला फार महत्त्वाचं स्थान, वास्तुशास्त्रात किचनबाबत महत्त्वपूर्ण असं सांगण्यात आलंय

वास्तुशास्त्रानुसार, चपाती बनवताना सावध रहायला हवं, चपाती करताना काही चूक झाल्यास, लक्ष्मी देवी नाराज होऊ शकते

लक्ष्मी देवीच्या अवकृपेमुळे आर्थिक समस्येचा सामना करावा लागू शकतो, कोणत्या चुका टाळायच्या? जाणून घेऊयात

चपाती बनवताना किती बनवल्या आहेत ते मोजू नये, असं केल्यास घरात दारिद्रय येतं, भरभराट नाहीशी होते

चपाती बनवताना तव्यावर पाणी टाकू नये, त्यामुळे येणाऱ्या आवाजामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येते

पहिली चपाती गाय किंवा श्वानासाठी काढावी, असं केल्याने अन्नपूर्णेचा आशीर्वाद मिळतो, शनि देवाची कृपा राहते

चपाती बनवून झाल्यानंतर पोळीपाट स्वच्छ करावं, तसं न केल्यास लक्ष्मी देवी नाराज होते

Disclaimer : वरील माहिती सामान्य माहिती धार्मिक मान्यतेवर आधारित आहे. टीव्ही9 मराठी याची पुष्टी करत नाही