दोनदा राम-राम का म्हटलं जातं? कारण माहितीय?

9 फेब्रुवारी 2025

अनेक जण एकमेकांना नमस्कारऐवजी राम-राम बोलून अभिवादन करतात, त्यानंतर दुसरी व्यक्तीही तसंच राम-राम म्हणते

राम-राम म्हटल्याने मोक्ष प्राप्ती होते, अशी हिंदू धर्मात मान्यता,  त्यामुळे अनेक जण सकाळी प्रभू रामाचं नाव घेतात आणि एकमेकांना अभिवादन करतात

एकमेकांना राम-राम करण्याची अनेक वर्षांची परंपरा आहे, 2 वेळा राम-राम करण्यामागे मोठं कारण

हिंदु धर्मात 108 अंकाला महत्त्व,  108 वेळा माळ जपली जाते, कारण माळेत 108 मनी असतात, 108 हा अंक फार शुभ मानला जातो

हिंदु शब्दावलीनुसार, राममधील पहिलं अक्षर 'र' हे सत्तावीसाव्या स्थानी, तर 'आ' जो मात्र्यासह र सोबत लागतो जो दुसऱ्या स्थानी, म 25 व्या स्थानी

अंक ज्योतिषनुसार, वरील सर्व अंका जोडल्यास 27+2+25=54 आणि 54+54 केल्यास 108, त्यामुळे राम-राम बोलल्यास 108 चा योग तयार होतो

राम-राम बोलण्याने एकदा माळ जपण्याइतकंच पुण्य लाभतं, म्हणजेच 108 वेळा माळ जपणं आणि 2 वेळा राम-राम बोलणं बरोबरीचं

Disclaimer : वरील सर्व माहिती वास्तुशास्त्रानुसार आणि धार्मिक मान्यतेनुसार आहे, टीव्ही9 मराठी याची पुष्टी करत नाही.