लक्ष्मी देवी की गणपती? सर्वात आधी कुणाची पूजा करावी?

27 फेब्रुवारी 2025

हिंदू धर्म शास्त्रानुसार, गणपतीला विघ्न हरणारा देवता मानलं जातं. त्यामुळे श्रीगणेशाला विघ्नहर्ता म्हटलं जातं 

लक्ष्मीला धन, सुख-समृद्धीची देवी असं म्हटलंय. लक्ष्मी देवी भगवान विष्णुची पत्नी आहे

लक्ष्मी देवी आणि गणपती दोघेही पूजनीय आहेत, मात्र दोघांपैकी आधी पूजा कुणाची करावी?

कोणत्याही शुभ कार्याच्या सुरुवातीआधी देव-देवतांची पूजा करण्याआधी गणपतीची पूजा केली जाते

गणपतीची पूजा केल्यानंतर लक्ष्मी देवीचं पूजन करावं, मान्यतेनुसार, गणपतीच्या पूजनाशिवाय लक्ष्मी देवीची पूजा अधुरी राहते

पौराणिक कथेनुसार, भगवान गणेश लक्ष्मी देवीचे दत्तक पुत्र, दिवाळीत दोघांची एकत्र पूजा केली जाते

लक्ष्मी मातेचं गणपतीला वरदान आहे की जो कुणी लक्ष्मीसह गणेश पूजन करणार नाही, त्याच्याकडे लक्ष्मी राहणार नाही

Disclaimer : वरील माहिती सामान्य आणि धार्मिक मान्यतेवर आधारित आहे. टीव्ही9 मराठी याची पुष्टी करत नाही