कुंभमध्ये हे एक नाणं मिळावं अशी प्रत्येकाची इच्छा.. काय आहे त्यामागचं कारण?
22 January 2025
Created By: Swati Vemul
प्रयागराजमध्ये 12 वर्षांनंतर महाकुंभचं आयोजन; 13 जानेवारीपासून याची झाली सुरुवात
आतापर्यंत जवळपास 8 कोटींपेक्षा जास्त लोकांनी महाकुंभमध्ये केलंय स्नान
महाकुंभमध्ये किन्नरांकडून मिळणाऱ्या एक रुपयाच्या नाण्याची जोरदार चर्चा
कुंभमेळ्यात किन्नर आखाड्याजवळ लोकांची बरीच गर्दी पहायला मिळते
किन्नर समुदायानुसार, किन्नरांकडून दिलं जाणारं नाणं आस्थेचं प्रतीक मानलं जातं
या मान्यतेनुसार, किन्नरांचा आशीर्वाद अत्यंत शुभ मानला जातो
किन्नरांकडून दिलं जाणारं नाणं हे आनंदी आयुष्य आणि समृद्धीचं प्रतीक मानलं जातं
जेव्हा कुंभमेळ्यात किन्नरांकडून आशीर्वादरुपी नाणं मिळतं, तेव्हा त्याला सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं
या नाण्याने घरात, कुटुंबात नेहमी सुखसमृद्धी नांदत असल्याचं म्हटलं जातं
सिद्धार्थ चांदेकर-मिताली मयेकरने घेतलं खंडोबाचं दर्शन
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा