बाबा बागेश्वर यांना भेटणं खूपच सोपं आहे, कसं ते जाणून घ्या
बाबा बागेश्वर नावाने प्रसिद्ध असलेल्या पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचं प्रवचन ऐकण्यासाठी लाखो लोकं हजेरी लावतात.
हजेरी लावणाऱ्या प्रत्येकाला बाबा बागेश्वर यांची भेट घेण्याची इच्छा असते. जर तुम्हालाही भेटायचं असेल तर धीरेंद्र शास्त्री यांनी स्वत: याबाबत सांगितलं आहे.
बाबाने सांगितलं की त्यांना भेटणं अगदी सोपं आहे. पण प्रत्येकाला कठीण वाटतं. जिथे दरबार असतो तिथे आलं की झालं.
रोज संध्याकाळी बागेश्वर धाममध्ये दरबार भरतो. यावेळी जवळपास 2 हजार लोकांनी विभूती वाटली जाते.
बाबाने सांगितलं की, त्यांच्या दरबारात व्हिआयपी कल्चर आहे. पण पैशांशी संबंधित नाही. मान सन्मान आणि प्रतिष्ठेची काळजी घेतली जाते.
बाबाने सांगितलं की, ते व्हिआयपी कल्चरच्या विरोधात आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे पैशांचा व्हिआयपी कल्चर नाही.