26 ऑक्टोबर 2024
Created By: राकेश ठाकुर
30 ऑक्टोबर 2024
Created By: राकेश ठाकुर
दिवाळीला या ठिकाणी लावा देवी लक्ष्मीची पावलं, आर्थिक अडचणी होणार दूर!
वास्तुशास्त्रानुसार, लक्ष्मीची पावलं घरात योग्य ठिकाणी लावली तर धन, समृद्धी आणि सकारात्मक उर्जेचा वास राहतो.
लक्ष्मीची पावलं लावण्याचं योग्य ठिकाणी मुख्य द्वाराजवळ असते. देवी लक्ष्मी घरात प्रवेश करते असं यातून दिसतं. अशा प्रकारे पदचिन्ह लावणं शुभ मानलं जातं.
पूजा घरात पवित्र स्थान असते. लक्ष्मीची पदचिन्ह मूर्तीच्या समोर लावल्यास पूजेत प्रभाव वाढतो.
तिजोरीजवळ देवी लक्ष्मीची पदचिन्ह लावल्यास धनवृद्धी होते अशी धार्मिक मान्यता आहे. पावलं तिजोरीच्या दिशेने असायला हवी.
वास्तुनुसार, देवी लक्ष्मीची पदचिन्ह किचनमध्येही स्थापित करू शकता. यामुळे सकारात्मक उर्जेचा संचार होतो. देवी लक्ष्मीची कृपा राहते.
देवी लक्ष्मीच्या पदचिन्हांमध्ये दिव्यशक्ती असते. यामुळे घरात सुख समृद्धी येते. धन, सुख समृद्धी आणि सौभाग्याचं प्रतिक आहे.
वास्तुशास्त्रानुसार देवी लक्ष्मीची पदचिन्ह कधीच दक्षिण दिशेला लावू नये. ही दिशा यमाची मानली जाते.