6 February 2024

जगातील सर्वात मोठे हिंदू मंदिर, पन्नास कोटी दगड, प्रत्येक दगडाचे वजन दीड टन

Mahesh Pawar

दक्षिण पूर्व आशियातील कंबोडिया देश सध्या राजकीय अस्थिरतेला तोंड देत आहे.

भारताचा या देशाशी खास संबंध आहे. कारण, या देशात हिंदू धर्माचे सर्वात मोठे प्राचीन मंदिर आहे.

12 व्या शतकात खमेर वंशाचे सूर्यवर्मन द्वितीय नामक हिंदू शासकाने या मंदिराचे निर्माण केले होते.

या राजाने तयार केल्या विशिष्ठ पूजास्थळामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश तिन्ही देवांची पूजा केली जात असे.

हे मंदिर बांधण्यासाठी पन्नास कोटी दगडांचा वापर करण्यात आला. प्रत्येक दगडाचे वजन दीड टन आहे.

मंदिरात सीताहरण, हनुमानाचा अशोक वाटिका प्रवेश, अंगद प्रसंग, राम-रावण युद्ध इ. कथांचे कोरीव काम आहे.

भगवान विष्णूंना समर्पित हे विशाल हिंदू मंदिर जगातील सर्वात मोठे पूजनस्थळ आहे.

भारतापासून जवळपास 5 हजार किलोमीटर अंतरावर कंबोडिया देशात हे मंदिर आहे.

जगातील हे सर्वात मोठे मंदिर सिमरिप शहरातील मीकांग नदी किनाऱ्यावर वसले आहे.

वर्ल्ड हेरिटेजच्या यादीत स्थान असलेले हे मंदिर कंबोडियाच्या राष्ट्रीय ध्वजात दाखवले गेले आहे.

लव मॅरेजसाठी पालकांची परवानगी हवीय? फोलो करा या टिप्स