11 मार्च 2025
चंद्रग्रहणातील सूतक काळ भारतात मान्य नाही, कारण...
चंद्रग्रहण ही खगोलीय घटना आहे. चंद्र आणि सूर्याच्या मधोमध पृथ्वी आल्याने ग्रहण लागतं.
14 मार्चला चंद्रग्रहण आहे. हे ग्रहण होळीला लागणार असल्याने त्याचं महत्त्व आहे.
चंद्रग्रहण भारतीय वेळेनुसार, सकाळी 9 वाजून 27 मिनिटांनी लागले. हे ग्रहण दुपारी 3 वाजून 30 मिनिटांपर्यंत असेल.
ज्योतिषशास्त्रात, चंद्रग्रहण अशुभ मानलं जातं. यात सूतक काळ अशुभ मानला जातो. या दरम्यान शुभ कार्य केली जात नाही.
पण चंद्रग्रहण भारतात दिसणार नाही. कारण जेव्हा चंद्रग्रहण लागणार तेव्हा भारतात सकाळ असेल. त्यामुळे भारतातून दिसणार नाही.
चंद्रग्रहण भारतात दिसणार नसल्याने सूतक काळही मान्य नसेल. चंद्रग्रहणाचा सूतक काळ हा 9 तासांचा असतो. त्यामुळे तो पाळण्याची गरज नाही.
चंद्रग्रहण ऑस्ट्रेलिया, वेस्टर्न अफ्रीका, यूरोप, पॅसिफिक महासागर, अटलांटिक, आर्क्टिक महासागर, उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिकेत दिसेल.