घरातील टॉयलेट करेल मालामाल! वास्तुशास्त्रानुसार असं काम करा
वास्तुशास्त्रात, टॉयलेटशी निगडीत नियम सांगितले गेले आहेत. या नियमांचं पालन केलं तर सकारात्मकता आणि सुख समृद्धी येते.
ज्योतिषशास्त्रानुसार, आयुष्यातील प्रत्येक गोष्टींचा संबंध नवग्रहांशी येतो. यात टॉयलेटचा संबंध पापग्रह राहुशी येतो.
वास्तुशास्त्रात टॉयलेटच्या दिशेचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. टॉयलेट उत्तर-पश्चिम किंवा पश्चिमेला असलं पाहीजे. पण वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक गोष्ट शक्य नाही. पण काही उपाय करून दोष दूर करता येईल.
वास्तुदोष असेल तर काचेच्या वाटीत खडे मीठ घेऊन टॉयलेटच्या कोपऱ्यात ठेवावं. तसेच टॉयलेट कायम स्वच्छ ठेवावं. यामुळे आर्थिक मार्ग खुले होतात.
घरातील टॉयलेट कायम स्वच्छ असावं. शौचालय तुटकंफुटकं काहीच नसावं. नळ गळती असेल तात्काळ बंद करावा.
टॉयलेटची स्वच्छता ठरावीक दिवशी करणं महत्त्वाचं आहे. यामुळे तुमची आर्थिक कोंडी फुटेल.
ज्योतिषशास्त्रानुसार, टॉयलेटची स्वच्छता बुधवार आणि शनिवारी करावी. राहुचा शुभ प्रभाव पडतो.