कोणत्या दिशेला तोंड करुन जेवण करु नये? जाणून घ्या 

7 फेब्रुवारी 2025

हिंदू धर्म शास्त्रानुसार, जेवण्याचे काही नियम आहेत, या नियमांचं पालन केल्यास कधीच धनाची कमी भासत नाही, असं म्हटलं जातं

वास्तूशास्त्रात जेवण्यासाठी दिशांचं महत्त्वं सांगितलंय, कोणत्या दिशेला तोंड करुन जेवल्यास काय फायदा याबाबतही सांगितलंय

वास्तूशास्त्रानुसार, पूर्वेला तोंड करुन जेवणं शुभ, या दिशेला तोंड करुन जेवल्यास देवाची कृपा होते, आरोग्यही चांगलं राहतं

उत्तरेला कुबेराचा वास असतो, त्यामुळे या दिशेला तोंड करुन अन्न ग्रहण केल्यास लक्ष्मी देवी प्रसन्न होते, पैशांची कमी भासत नाही

वास्तुशास्त्रानुसार, चांगल्या तब्येतीसाठी पश्चिमेला तोंड करुन जेवण करणं लाभकारक, अशाने कुटुंबातील सदस्य कमी आजारी होतात, आनंदाचं वातावरण राहतं

दक्षिण ही पित्रांची दिशा, त्यामुळे त्या दिशेला तोंड करुन जेवणं टाळावं, वास्तुशास्त्रानुसार, असं केल्यास घरात आजार येऊ शकतो

Disclaimer : वरील सर्व माहिती वास्तुशास्त्रानुसार आणि धार्मिक मान्यतेनुसार आहे, टीव्ही9 मराठी याची पुष्टी करत नाही.