3 फेब्रुवारी 2025
शिवलिंगावर जल अर्पण बसून केलं तर चालतं का? जाणून घ्या
हिंदू धर्मात महादेवांची पूजा करण्यासाठी शिवलिंगाचं महत्त्व अधोरेखित केलं आहे. शिवलिंगाची पूजा केल्याने महादेव लवकर प्रसन्न होतात.
धर्मशास्त्रात, शिवलिंगाची पूजा करण्यापासून जल अर्पण करण्याचे नियम सांगितले गेले आहेत. या नियमांचं पालन करणं आवश्यक आहे.
भाविक मोठ्या श्रद्धेने शिवलिंगावर जल अर्पण करण्यासाठी जातात. पण शिवलिंगावर बसून की उभं राहून जल अर्पण करावं हे कळत नाही.
धार्मिक मान्यतेनुसार, शिवलिंगावर जल अर्पण बसून करावं. उभं राहून जल अर्पण केल्यास फळ मिळत नाही.
शिवलिंगावर जल अर्पण करण्यासाठी बसूनच करावं. पण चुकीच्या दिशेला तोंड करून बसू नये.
शिवलिंगावर जल अर्पण करताना उत्तरेकडे तोंड असावं. शिवलिंगावर जल अर्पण करताना पूर्व किंवा दक्षिणेकडे तोंड करू नये.
शिवलिंगावर मंत्र जप करत जल अर्पण करावं. इतकंच काय तर जल अर्पण करण्यासाठी तांब्याच्या भांड्याचा वापर करावा.
शिवलिंगावर जल अर्पण केल्यानंतर पूर्ण परिक्रमा करू नये. जल अर्पण केल्यानंतर अर्ध परिक्रमा करावी.