11 फेब्रुवारी 2025
संजीवनी बुटीसाठी उड्डाण घेणाऱ्या हनुमंताचा फोटो घरात लावल्याने काय होतं? जाणून घ्या
घरात हनुमंताचा फोटो असणं खूप शुभ मानलं जातं. लोकं घरात हनुमंताचे वेगवेगळ्या स्वरुपातील फोटो लावतात.
काही जण उड्डाण घेतलेल्या हनुमंताचा फोटो लावतात. पण उड्डाण घेतलेल्या हनुमंताचा फोटो लावल्याने काय होतं?
वास्तुशास्त्रानुसार, उड्डाण घेतलेल्या हनुमानाचा फोटो घरी लावणं शुभ आणि लाभदायी असतं.
या फोटोमुळे प्रगती, यश आणि नवी शिखरं गाठण्यास मदत होते. जीवनात उत्साह आणि साहस वाढतं.
मेहनत करूनही यश मिळत नसल्यास घरात उड्डाण घेतलेल्या हनुमानाचा फोटो लावावा. यामुळे अडकलेली कामं पूर्ण होतात.
वास्तुशास्त्रानुसार, घरात उड्डाण घेतलेल्या मारुतीचा फोटो लावल्याने इच्छित यश मिळतं. तसेच जीवनात प्रगती होते.
वास्तुशास्त्रानुसार, हनुमंताचा फोटो दक्षिण दिशेला लावावा. यामुळे सुख समृद्धी आणि यश मिळतं.