5 मार्च 2025

होलिका दहनानंतर त्या राखेचं काय होतं? जाणून घ्या

हिंदू धर्मात होलिका दहनानंतर त्या राखेचं विशेष महत्त्व आहे. ही राख पवित्र मानली जाते. अनेक धार्मिक आणि पारंपरिक प्रथेत याचा वापर केला जातो. 

काही जण होलिका दहनातील राख माथ्यावर टिळा म्हणून लावतात. यामुळे नकारात्मक उर्जेपासून बचाव होतो. 

होलिका दहनाची राख आपल्या घरी थोडी थोडी कोपऱ्याकोपऱ्यात टाकली पाहीजे. यामुळे घरावरील वाईट नजर दूर होते. 

काही जण होलिका दहनाची राख पवित्र नदीत विसर्जित करतात. यामुळे पूर्वजांच्या आत्म्याला शांती लाभते, तसेच पापांचा नाश होतो असा समज आहे. 

तांत्रिक विद्येत होलिका दहनाची राख वाईट शक्तिचा प्रभाव कमी करण्यासाठी केला जातो. यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते. 

मान्यतेनुसार, होलिका दहनाची राख लाल कपड्यात बांधून तिजोरीत ठेवल्यास वर्षभर आर्थिक स्थिती चांगली राहते. 

मान्यतेनुसार, आजारी व्यक्तीला होलिका दहनातील राख लावल्याने होळीपासून चैत्र पौर्णिमेपर्यंत लावल्यास सकारात्मक प्रभाव दिसतो.