शनिवारी मोहरीचं तेल दान केल्याने काय होतं? जाणून घ्या
हिंदू धर्मात प्रत्येक वार हा कोणत्या ना कोणत्या देवाला समर्पित आहे. शनिवार हा शनिदेवांचा दिवस मानला जातो.
शनिवारी अनेक जण मोहरीचं तेल दान करतात. चला जाणून घेऊयात शनिवारी मोहरीचं तेल दान केल्याने काय होतं?
धार्मिक मान्यतेनुसार, शनिवारी मोहरीचं तेल दान करणं शुभ मानलं जातं. यामुळे शनिदेवांची कृपा होते.
मोहरीचं तेल शनिदेवाशी निगडीत मानलं जातं. मोहरीचं तेल दान केल्याने शनिदोषातून मुक्ती मिळते.
शनिवारी मोहरीचं तेल दान केल्याने जीवनात सुख समृद्धी येते आणि अडचणी दूर होतात.
कर्ज घेतलं असेल तर दिलासा मिळतो. आर्थिक स्थिती सुधारते आणि जीवनात सकारात्मक बदल होतात.
शनिवारी सकाळी लोखंडाच्या भांड्यात मोहरीचं तेल घ्या. त्यात एक रुपयाचं नाणं टाका. त्यात स्वत:चा चेहरा पाहा आणि त्यानंतर हे तेल गरीबाला दान करा किंवा पिंपळ वृक्षाखाली ठेवा.