27 फेब्रुवारी 2025

शनिची महादशा सुरू झाल्यावर काय होतं?

शनिची महादशा 19 वर्षांची असते आणि याचा प्रभाव शनिची कुंडलीतील स्थान, राशी, भाव आणि अंतर्दशेवर अवलंबून असते. 

ज्योतिषशास्त्रानुसार, शनि जीवनात जातकाची परीक्षा घेतो. शनि शुभ स्थानात असेल तर मेहनतीचं चांगलं फळ मिळतं. पण तसं नसेल तर त्रास सहन करावा लागतो. 

शनिची महादशा व्यक्तीच्या आयुष्यात उलथापालथ करते. त्यामुळे जगणं असह्य होतं. धीर आणि सहनशीलतेची परीक्षा घेतली जाते. 

ज्योतिषशास्त्रानुसार, शनी मेहनती लोकांना यश देतात. पण प्रगती हळूहळू होत असते. शनि कमकुवत असेल तर नोकरीच्या ठिकाणी त्रास होतो. 

ज्योतिषशास्त्रानुसार, शनि कुंडलीत चांगल्या स्थितीत असेल तर व्यक्ती यशाची नवी शिखरं गाठू शकतो. 

शनिच्या महादशेत नात्यात दूरावा, गैरसमज आणि वेगळं होण्याची स्थिती उद्भवते. शनि अनुकूल असेल तर धीर मिळतो. 

शनिच्या महादशेत शनिच्या मंत्राचा जप करावा. तसेच गरजवंतांना दान किंवा मदत करावी.