4 मार्च 2025
तेवत्या दिव्याखाली गहू ठेवल्याने काय होतं? जाणून घ्या
देव्हाऱ्यात पूजा करताना दिवा लावला जातो. यामुळे सकारात्मक उर्जेचा संचार होतो.
तेवत्या दिव्याखाली काही धान्य ठेवली जातात. यात गहूही ठेवले जातात. चला जाणून घेऊयात तेवत्या दिव्याखाली गहू ठेवल्याने काय होतं?
मान्यतेनुसार, गव्हाचं आसानावर दिवा लागणं शुभ मानलं जातं. यामुळे शुभ फळं मिळतात.
मान्यतेनुसार, गव्हावर तेवता दिवा ठेवल्याने देवी लक्ष्मीची कृपा होते. आर्थिक कोंडी फुटते.
अन्नपूर्णा देवीचा आशीर्वाद मिळतो. तसेच घरात अन्नधान्याची उणीव भासत नाही.
घरात सुख समृद्धी आणि शांतता राहते. यामुळे दिव्याखाली गहू ठेवण्याची प्रथा आहे.
तेवता दिवा आणि त्याखाली गहू ठेवले तर आर्थिक कोंडी फुटते. तसेच पैशांचा फ्लो सुरु राहतो.