20 फेब्रुवारी 2025
मंदिरात झाडू दान केल्याने काय होतं?
मंदिरात झाडू दान करण्याचं धार्मिक आणि ज्योतिषीय महत्त्व आहे. झाडू ही दरिद्रता आणि नकारात्मक ऊर्जा दूर करते.
झाडू ही देवी लक्ष्मीचं प्रतीक आहे. झाडू दान केल्याने देवी लक्ष्मीची कृपा होते. घरात सुख समृद्धी येते.
ज्योतिषशास्त्रानुसार, शनिवारी झाडू दान केल्याने आर्थिक स्थिती सुधारते.
ज्योतिषशास्त्रानुसार, झाडू स्वच्छतेचं प्रतीक आहे. त्यामुळे घर आणि जीवनातील नकारात्मकता दूर होते.
एखादी व्यक्ती कर्जाखाली बुडाली असेल, तर शनिवारी किंवा अमावास्येला मंदिरात झाडू दान केल्यास दिलासा मिळू शकतो.
ज्योतिषशास्त्रात झाडू ही राहु आणि केतुशी निगडीत आहे. दान केल्याने या दोन्ही ग्रहांचा अशुभ प्रभाव कमी होतो.
झाडू शनिवार, अमावास्या किंवा ग्रहणावेळी दान केल्यास शुभ मानली जाते.