6 मार्च 2025
पुस्तकात मोर पिस ठेवल्याने काय होते?
पुस्तकात मोर पिस ठेवण्याची एक प्राचीन परंपरा आणि त्याचं धार्मिक महत्त्वही आहे. मोर पिस भगवान विष्णुला प्रिय आहे. यामुळे विष्णुंची कृपा होते.
विद्यादेवी सरस्वतीचं वाहन मोर आहे. यामुळे पुस्तकात विद्या आणि ज्ञानात भर पडावी यासाठी मोर पिस ठेवलं जातं. यामुळे करिअरमध्ये प्रगती होते.
मोर पिसामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते. यामुळे अभ्यासात मन लागतं आणि एकाग्रता वाढते.
मोर पिस हे विद्येचं प्रतिक आहे. यामुळे विद्येत भर पडते आणि अज्ञान दूर होतं. ज्ञानग्रहणात येणाऱ्या अडचणी दूर होतात.
मोर पिसामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो. तसेच शिकण्याची वृत्ती वाढत जाते, असा समज आहे.
मोर पिस स्वच्छ आणि व्यवस्थित असावं. पुस्तकात ते खराब होऊ नये याची काळजी घ्यावी. गरज पडल्यास बदलावं.