4 फेब्रुवारी 2025

काशीत अंत्यसंस्कार केल्याने काय होतं? जाणून घ्या

हिंदू धर्मात काशी म्हणजेच वाराणसी ही मोक्षभूमी मानली गेली आहे. यामुळे अनेक जण अंत्यसंस्कार काशीत करण्याची इच्छा व्यक्त करतात. 

काशीत अंत्यसंस्कार केल्याने आत्म्याला मोक्षप्राप्ती होते. काशीत अंत्यसंस्कार केल्याने पुनर्जन्म होत नाही अशी मान्यता आहे. 

काशी ही महादेवांची नगरी आहे. शिवांना मोक्षदाता संबोधलं जातं. शिवकृपेने काशीत अंत्यसंस्कार झाल्यास मोक्षप्राप्ती होते. 

काशीत मणिकर्णिका घाट यासाठी प्रसिद्ध आहे. या घाटावर अंत्यसंस्कार केल्याने मोक्ष प्राप्तीची शक्यता वाढते. 

पुराण आणि अन्य धार्मिक ग्रंथात काशीचा मोक्षभूमी असा उल्लेख आहे. येथे मृत्यू आणि अंतिम संस्कार झाल्याने आत्मा पवित्र होते.

काशीत अंत्यसंस्कार केल्याने मृतव्यक्तीला नरकाता यातना भोगाव्या लागत नाहीत. तसेच मोक्षप्राप्तीचा मार्ग सोपा होतो. 

काशीत आध्यात्मिक उर्जेचा स्तर अधिक आहे. यामुळे आत्म्याला मोक्ष गती मिळण्यास मदत होते.