26  जानेवारी 2025

दक्षिण दिशेला फिश टँक असेल तर काय? जाणून घ्या वास्तुशास्त्र

वास्तुशास्त्रानुसार, घरात फिश टँक ठेवणं शुभ मानलं जातं. पण यासाठी काही नियम आहेत. 

काही जण जिथे जागा मिळेल तिथे फिश टँक ठेवतात. मग ती कोणतीही दिशा असो.. पण दक्षिण दिशेला फिश टँक असेल तर काय?

वास्तुशास्त्रानुसार, दक्षिण दिशेला फिश टँक ठेवू नये. दक्षिण दिशेला पाण्याशी निगडीत वस्तू ठेवणं अशुभ मानलं जातं. 

दक्षिण दिशा ही अग्नि तत्वाशी निगडीत आहे. त्यामुळे या ठिकाणी जलतत्व असलेल्या वस्तू ठेवू नयेत. 

दक्षिण दिशेला फिश टँक असेल तर घरात वास्तुदोष निर्माण होतो. यामुळे आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. 

दक्षिण दिशेला ठेवलेल्या फिश टँकमुळे करिअर आणि व्यवसायाचं नुकसान होऊ शकतं. 

वास्तुशास्त्रानुसार, घरात फिश टँक कायम उत्तर किंवा ईशान्य कोपऱ्याला ठेवावं. 

(डिस्क्लेमर : माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)