17 जानेवारी 2025
घराच्या छतावर काय ठेवणं शुभ मानलं जातं? जाणून घ्या
वास्तुशास्त्रानुसार घराच्या छतावर काही वस्तू ठेवणं शुभ मानलं जातं. यामुळे घरात सुख समृद्धी आणि शांती येते.
टेरेसवर तुळशी, मनी प्लांट किंवा अन्य हिरवी रोपं ठेवणं शुभ असतं. यामुळे सकारात्मक उर्जेचा वास होतो.
घरावर ध्वज लावल्याने सकारात्मक ऊर्जा मिळते. यावर स्वास्तिक किंवा ओम ही चिन्ह असल्यास शुभ ठरतं.
ज्योतिषशास्त्रानुसार, टेरेसवर कुंडली यंत्र ठेवल्यास घरात सकारात्मक उर्जेचा संचार होतो. घरातील सदस्यांच्या जीवनात सुधारणा होते.
पांढऱ्या रंगाच्या फुलांची रोपं टेरेसवर लावल्यास एक चांगली ऊर्जा मिळते. घरात आनंदाचं वातावरण राहतं.
पक्षांसाठी जलपात्र आणि दाणे ठेवणंही शुभ मानलं गेलं आहे. यामुळे घरात सुख समृद्धी येते.
टेरेसवर भंगार आणि काटेरी रोपं ठेवू नयेत. यामुळे घरात तणावाची स्थिती निर्माण होते.