शनिदेवांच्या पूजेत काय वर्जित मानलं जातं?
2 August 2025
Created By: मयुरी सर्जेराव
कर्मदाता म्हणून शनिदेवांना ओळखलं जातं. म्हणूनच त्यांच्या पूजेदरम्यान काही गोष्टी वापरण्यास मनाई असते
शनिदेवांच्या पूजेत लाल फुले, तांब्याची भांडी आणि शंख यासारख्या काही गोष्टी निषिद्ध असतात.
शनिदेवाला लाल रंग आवडत नाही. म्हणून शनिदेवाला लाल फुले अर्पण करू नयेत.
तांबे हे सूर्यदेवाचे प्रतीक आहे आणि सूर्यपुत्र असूनही, शनिदेवाला त्यांचा शत्रू मानलं जातं. म्हणूनच त्यांच्या पूजेत तांब्याची भांडी वापरू नयेत.
शंख चंद्राशी संबंधित आहे, जो शनिदेवाच्या विरुद्ध मानला जातो. म्हणूनच त्यांच्या पूजेमध्ये शंख वापरू नये.
तुळस ही भगवान विष्णूंची आवडती मानली जाते. म्हणून शनिदेवांच्या पूजेमध्ये तुळशीचा वापर करू नये.
शास्त्रांनुसार, महिलांना शनिदेवाच्या मूर्तीला स्पर्श करणे, तेल अर्पण करणे निषिद्ध मानले जाते
( डिस्क्लेमर : ही माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही, अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
दाराच्या मागे कपडे अडकवल्याने घरात काय अडचणी येतात?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा