24 जानेवारी 2025
अंतिम संस्कार करताना शेवटी मडकं फोडण्याचं कारण काय?
अंतिम संस्कार करताना हिंदू धर्मात शेवटी मडकं फोडण्याची प्रथा आहे. यामागे काही धार्मिक कारणं सांगितली आहेत.
हिंदू धर्मानुसार, शेवटी मडकं फोडल्याने आत्म्याचं शरीराशी असलेला संबंध तुटतो. मडकं हे जीवनाचं प्रतीक आहे. भरलेलं पाणी हे जीवनाची नश्वरता दर्शवते.
हिंदू धर्मानुसार, मडकं फोडल्याने आत्म्याला संदेश दिला जातो. या जगाची आसक्ती सोडली पाहीजे आणि पुढे वाटचाल केली पाहीजे.
मडक्याला एक छिद्र पाडलं जातं. त्यातून पाणी सतत पडत असतं. हे जीवनचक्राचं प्रतिनिधीत्व करतं. जसा वेळ जातो तशी जीवन उर्जाही संपते.
हिंदू धर्मानुसार, मानवी शरीर हे पंचतत्वांनी बनलं आहे. पृथ्वी, पाणी, अग्नि, वायू आणि आकाश.. यापैकी पाणी एक घटक असून ते फोडल्याने जमीनीत विलीन होते.
हिंदू धर्मानुसार, मडकं फोडल्यानंतर मृत व्यक्ती सर्व बंधनं, आसक्ती आणि भौतिक सुखापासून मुक्त होतो.
मडकं फोडल्याने सदर व्यक्तीला मोक्ष मिळतो अशी धारणा आहे. तसेच शरीर पंचतत्वात विलीन होते.