2 मार्च 2025
अंत्यसंस्कारावेळी चितेवर फुलं आणि पैसे अर्पण करण्याचं कारण काय? जाणून घ्या
हिंदू धर्मात व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर शेवटच्या प्रवासात चितेवर फुलं आणि पैसे अर्पण करण्याची परंपरा आहे. यामागे काही धार्मिक आणि सामाजिक कारणं आहेत.
वडीलधाऱ्या व्यक्तींच्या मते, फुले आणि पैसे अर्पण करून मृत व्यक्तीला आदर आणि श्रद्धांजली दिली जाते.
फुलं ही शांतीचं प्रतिक मानली गेली आहेत. त्यामुळे मृत्यात्म्याला शांती मिळते. तसेच फुलातून सकारात्मक ऊर्जा मिळते.
फुले निसर्गाशी जोडलेली असतात. त्यामुळे मृत व्यक्तीच्या आत्मा निसर्गाशी जोडला जातो, असा समज आहे.
अंत्यसंस्कारावेळी चितेवर पैसे अर्पण करणं हे दानाचं प्रतिक आहे. यामुळे मृत आत्म्याला शांती आणि स्वर्गात स्थान मिळते, असं बोललं जातं.
काही भागात अंत्यसंस्कारावेळी खर्च भागवण्यासाठी पैशाचे दान वापरले जाते. पैसे देणे हा एक सामाजिक भाग मानला जातो.
मृतदेहाजवळ नाणी ठेवून एक सामाजिक संदेश दिला जातो. पैसा जवळ असूनही मृत्यूनंतर व्यक्ती सोबत काहीच नेत नाही असं स्पष्ट दिसतं.
काही लोकांच्या मते, फुले आणि पैसे अर्पण केल्याने मृत आत्म्याला मृत्यूनंतरच्या प्रवासात आणि कुटुंबाला दुखातून सावरण्यात मदत होते.