18 फेब्रुवारी 2025

नवी गाडी घरी आणल्यानंतर पहिल्यांदा पूजा करण्याचं कारण काय? जाणून घ्या

भारतीय लोकं नवीन गाडी घेतली की पहिल्यांदा पूजा करतात. गाडीची पूजा करणं महत्त्वाचं आणि शुभ मानलं जातं. 

हिंदू धर्मात नवी गाडी घेतल्यानंतर पूजा करण्याची एक प्रथा रूढ झाली आहे. पण असं करण्याचं कारण काय?

हिंदू धर्मात वाहनाला भगवान गरूडाचं स्वरूप मानलं जातं. गाडी पूजा केल्याने व्यक्तीचा प्रवास सुखरूप होतो, अशी मान्यता आहे. 

हिंदू धर्मात नवी गाडी घेतल्यानंतर पूजा केली जाते. जेणेकरून अपघात वगैरे होऊ नये आणि प्रवास सुखकर व्हावा. 

वाहन घरी आणल्यानंतर त्याची पूजा केल्याने गाडीच्या माध्यमातून नुकसान वगैरे होत नाही, अशी मान्यता आहे.

हिंदू धर्मात नवी उपकरणं आणि यंत्र आणली की त्याचा वापर करण्यापूर्वी पूजा केली जाते. 

गाडीच्या पूजेवेळी कापूर, नारळ, हार, अक्षत, पाण्याने भरलेला कळश, गूळ किंवा मिठाई, कलावा, शेंदूर आणि गंगाजल आवश्यक आहे.