शनि अमावस्येला कोणते उपाय करावे?

20 August 2025

Created By: मयुरी सर्जेराव

शनिदेवाचा आशीर्वाद मिळविण्यासाठी शनि अमावस्येचा दिवस खूप खास मानला जातो

शनि दोषापासून मुक्ती मिळविण्यासाठी या दिवशी अनेक उपाय करणे शुभ मानले जाते

या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करा.

शनि मंत्राचा 108 वेळा जप करा. शनी मंत्र : 'ओम शनैश्चराय नमः

शनिदेवाच्या चरणी मोहरीचे तेल अर्पण करा.

या दिवशी काळी उडद डाळ, काळे तीळ, लोखंड दान करा. गरजूंची सेवा करा, घरी येणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला रिकाम्या हाताने जाऊ देऊ नका

संध्याकाळी शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी मोहरीच्या तेलात तीळ आणि उडीद डाळ टाकून दिवा लावा.

( डिस्क्लेमर : ही माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही )