मृत्यूनंतर पहिलं श्राद्ध कधी करावं?

2 September 2025

Created By: मयुरी सर्जेराव

या वर्षी पितृपक्ष 7 सप्टेंबरपासून सुरू होत आहे आणि 21 सप्टेंबर रोजी संपेल. या काळात पितरांसाठी श्राद्ध, पिंडदान केले जाते.

कुटुंबातील सदस्याच्या मृत्यूनंतर पहिले श्राद्ध कधी करावे? याबद्दल अनेकदा गोंधळ होतो

धार्मिक मान्यतेनुसार, कोणत्याही व्यक्तीच्या मृत्यूनंतरच्या पहिल्या श्राद्धाला वार्षिक श्राद्ध म्हणतात.

मृत्यूनंतरचे पहिले श्राद्ध पुढील वर्षीच्या त्याच दिवशी मृत्युच्या तिथीनुसार करावे, मृत्युनंतरच्या पहिल्या 10 दिवसांत किंवा पितृपक्षात नाही.

पिंडदान विधी मृत्यूनंतर पहिल्या 10 दिवसांत केला जातो, तर वार्षिक श्राद्ध मृत्युच्या पहिल्या पुण्यतिथीला केले जाते.

मृत व्यक्तीचे श्राद्ध देखील 15 दिवसांच्या पितृपक्षात केले जाते. तर, वैयक्तिक श्राद्ध व्यक्तीच्या मृत्युच्या तारखेनुसार केले जाते.