20  जानेवारी 2025

असं काही घडलं की कळतं तुम्हाला वाईट नजर लागलीय की नाही?

वाईट नजर लागली असं आपण अनेकदा ऐकतो. कधी कधी बोलतोही. पण खरंच असं झालं असेल तर ज्योतिषशास्त्रात काही संकेत सांगितले गेले आहेत. 

ज्योतिषशास्त्रानुसार, कोणत्याही ठोस कारणाशिवाय वारंवार आजारी पडणं हे वाईट नजर लागल्याचे संकेत आहेत. 

विनाकारण थकवा, कमकुवतपणा, चक्कर येणं, चिंता, तणाव आणि अशीच भिती वाटणे हे नजर लागण्याचे संकेत असल्याचं ज्योतिषशास्त्र सांगतं.

विनाकारण वारंवार आर्थिक नुकसान होणं. तसेच कोणतेही काम हाती घेतलं की त्यात फटका बसणं हे देखील वाईट नजर लागण्याचे संकेत असतात.

ज्योतिषशास्त्रानुसार, कुटुंबात वारंवार भांडणं होणं हे देखील वाईट शक्तिंचा प्रभाव मानला जातो. त्यामुळे घरात चिंतेचं वातावरण राहतं. 

लहान मुलांचं विनाकारण रडणं आणि अस्वस्थ राहणं हे देखील वाईट नजर लागण्याचे संकेत मानले जातात. 

ज्योतिषशास्त्रानुसार, बचावासाठी  हनुमान चालीसा, दुर्गा सप्तशती, गायत्री मंत्राचं नियमित पठण करावं. घराच्या मुख्य दाराला लिंबू मिरची बांधावी.