21 फेब्रुवारी 2025

अयोध्येच्या राम दरबारात कधी बसवणार सर्व मूर्ती? निर्माण समितीने सांगितलं की..

अयोध्येच्या राम मंदिराचं काम वेगाने पूर्ण होत आहे. मंदिर परिसरात वेगवेगळ्या मूर्ती स्थापित केल्या जाणार आहेत. यावर राम मंदिर निर्माण समितीने अपडेट दिलं आहे. 

अयोध्या राम मंदिर निर्माण समिती अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी सांगितलं की, 15 मार्च ते 30 एप्रिल दरम्यान राम दरबारात स्थापित होणाऱ्या सर्व मूर्ती येतील. 

मंदिर निर्माण व्यवस्थेबाबत आतापर्यंत एकूण 4 बैठका झाल्या आहेत. या बैठकीत निर्माण कार्य करणारे अभियंते आणि ट्रस्ट सदस्य होते. 

मंदिरावर लाईटिंग कशी असेल? बैठकीत यावरही चर्चा झाली. यावर चार कंपन्यांनी रूची दाखवली आहे. 

नृपेंद्र मिश्रा यांनी सांगितलं की, मंदिराच्या आतील मूर्ती कशा आणल्या जातील यावर बैठकीत सविस्तर चर्चा झाली.

अयोध्येत राम मंदिर प्राणप्रतिष्ठा मागच्या वर्षी 22 जानेवारी 2024 रोजी झाली होती. यावळी राममंदिराचा पहिला वर्धापन दिन साजरा केला गेला.