रुद्राक्ष घालून कुठे जाऊ नये?

19 August 2025

Created By: मयुरी सर्जेराव

 रुद्राक्ष धारण करण्यासाठी व्यक्तीला अनेक नियमांचे पालन करावे लागते.

धार्मिक श्रद्धेनुसार, काही ठिकाणी रुद्राक्ष घालून जाणे निषिद्ध मानले जाते.

रुद्राक्ष घालून स्मशानात जाऊ नये. तसेच, ज्या घरात कोणी मृत पावले आहे त्या घरात रुद्राक्ष घालून जाऊ नये

रुद्राक्ष धारण करणाऱ्या व्यक्तीने मांस आणि मद्य सेवन करू नये. आणि अशा ठिकाणी जाऊ नये

ज्योतिषशास्त्रानुसार, ज्या ठिकाणी मूल जन्माला आले त्या ठिकाणीही रुद्राक्ष घालू नये, कारण तो काळ सुतक काळ मानला जातो.

धार्मिक श्रद्धेनुसार, झोपण्यापूर्वी रुद्राक्ष काढावा, कारण झोपताना शरीर अपवित्र मानले जाते.

( डिस्क्लेमर : ही माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही)