संत प्रेमानंद महाराज वृंदावनमधील संत आहे. ते राधाराणीचे मोठे भक्त आहेत. त्यांचा मोठा भक्त परिवार आहे.
3 April 2025
Created By : Jitendra Zavar
माता लक्ष्मी काही घरात थांबत नाही, त्याची कारणे संत प्रेमानंद महाराज यांनी सांगितली.
प्रेमानंद महाराज यांच्यानुसार, ज्या घरात महिलांचा सन्मान होत नाही, त्या घरात माता लक्ष्मी टिकत नाही. त्या घरात नेहमी आर्थिक अडचण असते.
माता लक्ष्मी स्वच्छता आणि पवित्रताचे प्रतीक आहे. ज्या घरात अस्वच्छता असते त्या ठिकाणी लक्ष्मीजीचा वास नसतो. यामुळे घरातील स्वच्छतेकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
ज्या ठिकाणी मेहनत आणि परिश्रम असते, त्या घरात लक्ष्मीजीचा निवास असतो. जी लोक आळसी असतात, कर्म करत नाही त्यांच्याकडे पैसे टिकत नाही.
घरात भांडण, कलह, नकारात्मक विचार, अपशब्दांचा प्रयोग अन् पापपूर्ण कार्य होत असतील तर लक्ष्मीजी अप्रसन्न असते. त्यामुळे घरात सुद्ध आचरण अन् सकारात्मक वातावरण राहिले पाहिजे.
जी लोक धर्म, पूजा पाठ करत नाही, देवी-देवतांचा अवमान करतात त्या ठिकाणी लक्ष्मीजी थांबत नाही. नियमित पूजा करणे अन् भगवंताचा सम्मान करणे आवश्यक आहे.
चुकीच्या कार्यात पैसे लावणे, विचार न करता पैसा खर्च केल्यावर माता लक्ष्मी अप्रसन्न असते. त्यामुळे पैशांचा योग्य उपयोग केला पाहिजे.
प्रेमानंद महाराज यांच्यानुसार, ज्या घरात नेहमी भांडण होतात, त्या ठिकाणी माता लक्ष्मी थांबत नाही.