3 फेब्रुवारी 2025
भीती वाटत असताना हनुमानाचा कोणत्या मंत्राचा जप करावा? जाणून घ्या
जेव्हा आपल्या मनात भीतीचं काहूर माजलं असतं तेव्हा आपण देवाचा धावा करतो. तेव्हा हनुमानाच्या मंत्राचा जप केल्याने मनातली भीती दूर होऊ शकते.
भीतीदायक वातावरणात हनुमानाच्या अनेक मंत्रांचा जप केला जाऊ शकतो. हे मंत्र फक्त भीती दूर करत नाही तर मनाला शांती देते.तसेच आत्मविश्वास वाढवते.
'ॐ हं हनुमते रुद्रात्मकाय हुं फट' या मंत्राचा जप केल्याने शत्रूपीडा, भीती, अनिद्रा दूर होते. हा प्रभावी मंत्र मानला गेला आहे.
'ॐ हं हनुमते नम:' हा मंत्रही शक्तिशाली मानला गेला आहे. या मंत्राच्या नियमित जपाने मन शांत होते. भीतीही दूर होते.
'श्री राम जय राम जय जय राम' हा मंत्र देखील प्रभावी आहे. या मंत्र जपाने सुरक्षाकवच तयार होते असं सांगितलं जातं. तसेच भीती दूर होते.
मंत्र जप करण्यासाठी एक शांत आणि एकांत जागा निवडा. जप करण्यापूर्वी स्नान करून शुद्ध व्हा. जप करताना पूर्व दिशेला मुख करून बसा.
हनुमानाचा मंत्र जप केल्याने मन शांत होते आणि आत्मविश्वास वाढतो. तसेच सर्व प्रकारचे संकट दूर होतात. तसेच संकटाचा सामना करण्याची ताकद मिळते.