6 मार्च 2025
तुळशी माळेने कोणत्या मंत्राचा जप करावा?
हिंदू धर्मात तुळशीच्या रोपाचं महत्त्व आहे. यात देवी लक्ष्मीचा वास आहे. भगवान विष्णूंना तूळस प्रिय आहे.
तुळशीची माळ खूप विशेष मानली जाते. तुळशी माळेवर जप केला जातो. चला जाणून घेऊयात तुळशी माळेवर कोणता जप केला जातो ते...
देवांचा आशीर्वाद मिळावा यासाठी मंत्रांचा जप केला जातो. देवांचा मंत्र जप करण्यासाठी वेगवेगळ्या माळा वापरल्या जातात.
तुळशी माळ खूपच शुद्ध मानली जाते. या माळेवर मंत्र जप करणं उत्तम मानलं जातं.
तुळशी माळेवर भगवान विष्णुंचा जप करावा. ओम नमो भगवते वासुदेवाय नम: या मंत्राचा जप करावा. यामुळे देवी लक्ष्मीची कृपा होते.
तुळशी माळेवर 'ओम देवकी सुत गोविंद वासुदेव जगत्पते, देही मे तनयं कृष्ण त्वामहं शरणं गत' या मंत्राचा जप करावा.
तुळशी माळा गळ्यात परिधान केल्याने काही आजारांपासून दिलासा मिळतो अशी मान्यता आहे. आत्मविश्वास, यश आणि नशिब फळतं.