4 फेब्रुवारी 2025
कबुतरांना दाणे खायला दिल्यास कोणता ग्रह मजबूत होतो? जाणून घ्या
अनेक जण कबुतरांना दाणे खाण्यासाठी देतात. धार्मिक आणि नैतिकदृष्ट्या हे पुण्यदायी मानलं जातं. ज्योतिषशास्त्रानुसार एक ग्रह यामुळे मजबूत होतो.
कबुतरांना दाणे देणं हे शनिशी निगडीत दोष कमी करतं. साडेसाती, अडीचकी आणि महादशेच्या काळात हा उपाय प्रभावी मानला जातो.
कबुतरांना दाणे दिल्यास चंद्राचा शुभ प्रभाव पडतो. मानसिक शांती आणि तणावातून मुक्ती मिळते.
ज्योतिषशास्त्रानुसार, कबुतरांना दाणे दिल्यास राहु आणि केतु ग्रह मजबूत होतो. पापग्रह शांत झाल्याने जातकांना दिलासा मिळतो.
कबुतरांना दाणे दिल्यास पुण्य फळ मिळतं. तसेच जीवनातील सर्व अडचणी दूर होतात, अशी मान्यता आहे.
पितृदोष कमी करण्यास मदत होते. इतकंच काय तर नकारात्मक ऊर्जा आणि वास्तु दोष दूर करण्यास मदत होते.
कबुतरांना दाणे दिल्यास घरात सुख समृद्धी येते. कबूतर देवी लक्ष्मीचा भक्त मानले जातात. त्यामुळे कबूतर आल्याने देवी लक्ष्मीची कृपा होते.
शनिवार आणि सोमवारी कबुतरांना ज्वारी-बाजरी किंवा मका देणं शुभ मानलं जातं. उपाय नियमित केल्यास सुख शांती लाभते.