10 February 2024
Mahesh Pawar
कोणत्याही धार्मिक विधीमध्ये देवी, देवतांच्या पूजे नंतर पंडित किंवा पुजारी लोकांच्या हातावर रक्षा सूत्र बांधतात.
या धाग्याला कलावा म्हणतात. हा धागा तीन रंगाचा असतो.
तीन धागे ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तीन शक्तींचे प्रतीक मानले जाते. याला रक्षासूत्र असेही म्हणतात.
यात लाल जास्त प्रमाणात तर पिवळा, सफेद, हिरवा रंग कमी जास्त प्रमाणात असतात.
रक्षासूत्र हातावर बांधल्याने लक्ष्मी देवी प्रसन्न राहते. यासोबतच हनुमानजींचा आशीर्वाद प्राप्त होतो.
लाल रंगाचा धागा धारण केल्याने आर्थिक लाभही होतो.
मकर, कुंभ आणि मीन राशीच्या लोकांनी लाल धागा कधीही बांधू नये.
या राशीचा स्वामी शनिदेव आहे. शनिदेवाला लाल रंग आवडत नाही. यामुळेच शनिवारी काळे तीळ दान करतात.
मेष, सिंह आणि वृश्चिक राशीच्या लोकांनी लाल धागा किंवा रक्षासुत्र बांधावे.
रक्षा सूत्र हातावर बांधल्याने नकारात्मक ऊर्जा दूर राहून सकारात्मक ऊर्जा संचारते.
विवाहित महिलांनी डाव्या हातावर तर अविवाहित मुली, पुरुषांनी उजव्या हाताला रक्षा सूत्र बांधावे.
देवी-देवता अप्रत्यक्षपणे रक्षा सूत्रात असतात त्यामुळे व्यक्तीच्या आर्थिक समस्या दुर होतात.
वडाच्या झाडाला रक्षा सूत्र बांधल्यास व्यक्तीचे आयुष्य वाढते.
तुलसीच्या झाडास रक्षा सूत्र बांधल्यास घरातील वाद विवाद नाहीसे होतात.
केळीच्या झाडांना रक्षा सूत्र बांधल्यास विष्णू देवाची विशेष कृपा प्राप्त होते.
पिंपळाच्या झाडास रक्षा सूत्र बांधल्यास घर सुख समृद्धी आणि शांतता राहते.
शमीच्या झाडास रक्षा सूत्र बांधल्यास वाईट शक्तींचा नाश होतो, राहू केतूचा दुष्परिणाम नाहीसा होतो.