17 मार्च 2025

व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर पायाची बोटं का बांधली जातात?

मृत्यूनंतर पायाची बोटं बांधण्याची प्रथा आहे. यामाने वैज्ञानिक आणि सामाजिक कारण सांगितलं जातं. 

हिंदू धार्मिक मान्यतेनुसार, मृत्यूनंतर पायाची बोटं बांधल्याने आत्म्याला शांती मिळते. तसेच मोक्षप्राप्ती होते. 

काही मान्यतेनुसार, मृत्यूनंतर शरीरात उर्जेचा प्रवाह असतो. पायाची बोटं बांधल्याने ही ऊर्जा नियंत्रित होते. 

हिंदू धर्मात मूलाधार चक्र हे जीवन उर्जेचं प्रतिक मानलं गेलं आहे. पायाची बोटं बांधून हे चक्र स्थिर केलं जातं. 

मृत व्यक्तीचे पायाची बोटं बांधणे हे सन्मानाचं प्रतिक आहे. ही प्रथा असून अनेक पिढ्यांपासून सुरु आहे. 

पायाची बोटं बांधण्यासाठी पांढरा कपडा किंवा धागा वापरतात. यामुळे मृत व्यक्तीच्या आत्म्याला सद्गती मिळते. 

पायची बोटं बांधण्याची प्रथा त्या त्या भागातील संस्कृती आणि धर्मानुसार वेगवेगळी असू शकते.