18  जानेवारी 2025

लग्नात तृतीयपंथी का मागतात शगुन? जाणून घ्या

तृतीयपंथी समाजातील महत्त्वाचा भाग आहे. तृतीयपंथी कोणलाही आशीर्वाद देतात तो वाया जात नाही, असं मानलं जातं. 

तृतीयपंथीयांचा संबंध बुध ग्रहाशी जोडला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार, बुध हा नपुंसक ग्रह आहे. तृतीयपंथीयांवर बुध ग्रहाचा प्रभाव असतो. 

तृतीयपंथी नेहमीच शुभ प्रसंगी शगुन घेण्यासाठी येतात. लग्न, सण इत्यादी प्रसंगी येतात आणि शगुन घेऊन आशीर्वाद देतात. 

लग्न असलेल्या घरी तर तृतीयपंथी नक्कीच वधुवरांना आशीर्वाद देण्यासाठी हजेरी लावतात. 

तृतीयपंथीयाने लग्नात येऊन वधुवराला आशीर्वाद दिला तर आयुष्य आनंदात जातं., असं मानलं जातं.

शुभ कार्यात शगुन मागण्याचा संबंध थेट त्रेतायुगाशी आहे. प्रभू रामचंद्रांनी तृतीयपंथीयांना वरदान दिलं होतं. 

रामचंद्रांनी सांगितलं होती की, नव्या पिढीला आशीर्वाद द्या. त्यामुळे तृतीयपंथी शुभ प्रसंगी शगुन मागण्यासाठी येतात.