8 मार्च 2025

होलिका दहनात गोवऱ्यांची माळ का टाकली जाते?

हिंदू धर्मात होळी सणाचं खूप महत्त्व आहे. वाईटाचा अंत आणि चांगल्याचा विजय म्हणून होलिका दहनाकडे पाहिलं जातं. 

होलिका दहनाच्या पूजेसोबत अनेक परंपरा पार पाडल्या जातात. त्यानंतर गोवऱ्यांची माळ जाळण्याची परंपरा आहे. त्यामागे धार्मिक आणि वैज्ञानिक कारण आहे. 

होलिका दहनात अनेक वस्तू अर्पण केल्या जातात. यात गोवऱ्यांची माळही अर्पण केली जाते. अग्नित गोवऱ्या नक्कीच जळतात.

हिंदू धर्मात गाईला देवतेचा दर्जा आहे. गाईत सर्व देवतांचा वास असतो असं मानतात. त्यामुळे होलिका दहनात गोवऱ्या जाळल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते. 

होलिका दहनात गोवऱ्या जाळल्याने कुटुंबातील अडचणी दूर होतात. सुख समृद्धीत वाढते आणि वातावरण शुद्ध होतं. 

अनेक ठिकाणी गोवऱ्यांची माळ गळ्यात घालून मुलांना फिरवलं जातं आणि ती माळ होळीत अर्पण केली जाते. यामुळे नजर दोषातून मुक्ती मिळते.